महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा - प्रमुख आयोजन - कांचन लाड
२०१८ च्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भाईंदर पूर्व येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे अध्यक्ष श्री रवि वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन जिल्हा सचिव - महिला आघाडी श्रीमती कांचन लाड यांनी केले होते. ह्या कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ जाधव, निवड समिती अध्यक्ष श्री धीरज पार्सेकर, सल्लागार श्री धनेश पाटील, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी श्रीमती वनिता पार्सेकर, जिल्हा सचिव महिला आघाडी श्रीमती जयलक्ष्मी सावंत, जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण सागर घाडगे, उपजिल्हा अध्यक्ष सुरेश गुप्ता, मीडिया प्रभारी ठाणे जिल्हा संजय लाड सोबत इतर मान्यवर, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment